उद्धव ठाकरेंमध्ये आम्हाला राहुल गांधी स्पष्टपणे दिसु लागले आहेत...

केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि मुख्ममंत्री उद्धव ठाकरे या दोघांमधील वैरत्व हे कोणापासुनच आज लपलेले नाहीये.संधी मिळताच हे दोघे एकमेकांवर शब्दांचे वार हे नेहमी करतच असतात.

पण आता ह्या शाब्दिक चकमकीत नारायण राणे यांच्या मुलाने देखील उडी मारली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात महाराष्टाचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचा प्रमुख असलेल्या उदधव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांना धारेवर धरत आमच्या आवाजाला दाबणे कोणालाच कधी शक्य होणार नाही.आणि आजपर्यत असा कोणी जन्मला देखील नाहीये असे वक्तव्य करत दसरा मेळाव्यात विरोधकांचा चांगलाच खरपुस समाचार घेतला.

याच घडलेल्या घटनेमुळे नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना असे म्हटले की दसरा मेळावा पार पडल्यापासुन उदधव ठाकरे यांच्यात आम्हाला आता राहुल गांधी स्पष्टपणे दिसुन येऊ लागले आहेत असा जोरदार टोला आपल्या टविटरच्या माध्यमातुन उदधव ठाकरे यांना दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की दसरा मेळावा भरल्यानंतर त्यात विविध विषयांवर उदधव ठाकरे यांनी भाषण केले होते.पण याच भाषणात बोलत असताना उदधव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टी पक्ष यांच्यावर जोरदार शब्दांचा हल्ला केला.

उदधव ठाकरेंच्या ह्या दसरा मेळावा भाषणातील वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टी देखील गप्प बसली नाही.त्यांनी देखील उदधव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिले आहे.

उदधव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील उदधव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

आता ह्यावर मुख्यमंत्री उदधव ठाकरे आणि शिवसेना पक्षाकडुन काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाणार याकडेच सगळयांचे लक्ष लागुन आहे.

Via News.360marathi


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत