इतरांचे वाईट व्हावे अशी ईच्छा मनात बाळगत असलेल्यांनी आधी आपले स्वताचे कारखाने किती चांगले चालता आहेत हे बघायला हवे असे जोरदार टिकास्त्र बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोडले आहे.

आमचा हेतु शुदध आणि प्रामाणिक आहे म्हणुन परमेश्वर देखील आमच्या पाठीशी आहे.पण काही लोक असतात ज्यांना इतरांचे चांगले चाललेले पाहावत नाही म्हणुन ते इतरांवर डावपेच करतात अशी जोरदार टीका तसेच आरोप बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर केला आहे.

निळवंडे ह्या धरणाच्या कालव्याचे काम हे अनेक वर्षापासुन रखडलेले होते.पण आता ह्या कामासाठी निधी प्राप्त झाला असल्यामुळे निळवंडे धरणाचे काम जोरात चाललेले आहे.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांनी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 55 व्या गळीत हंगाम प्रसंगी भाषण देताना असे वक्तव्य केले आहे की काही लोक फक्त आमच्यावर सातत्याने राग काढण्याचे काम करतात.पाणी वाटपावर जेव्हा आम्ही बोललो आणि मोर्चे तसेच आंदोलने केली तेव्हा ते आपल्या घरांमध्ये लपुन बसलेले होते.असे जोरदार टिकास्त्र बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोडले आहे.

इतरांचे वाईट होऊ ईच्छित असलेल्यांनी आधी आपले कारखाने किती चांगले चालता आहे हे बघायला हवे असे देखील ते म्हणाले.






प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत