भाजप नेते किरीट सोमय्या यांनी असे वक्तव्य केले आहे की आयकर विभाग 184 कोटींचे चाललेले बेनामी व्यवहार उघडकीस आणणार आहे.यासाठी आयकर विभागाने तब्बल 70 ठिकाणी तशी मोहीम सुरू केलेली आहे.अशी माहीती त्यांनी दिली आहे.ज्यात कोटवधींची रक्कम तसेच ज्वेलरी जप्त केली असल्याचा दावा देखील आयकर विभागाच्या प्रेस नोटचा दाखला देऊन किरीट सोमय्या यांनी केला आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना किरीट सोमय्या यांनी अजित पवारांना निशाण्यावर धरत म्हटले आहे” की मुंबई,पुणे,बारामती,गोवा जयपुर इत्यादी अशा एकुण 70 ठिकाणी अजित पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या संपत्तीवर त्यांनी छापे टाकले आहेत असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे”.
आयकर विभागाने याबाबत महाराष्टासोबतच अन्य इतर 70 ठिकाणी देखील कसुन तपास केला आहे.आणि तपासाअंती 184 कोटी एवढी छुपी रक्कम चौकशीदरम्यान आयकर विभागाच्या हाती आली आहे.
पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांचा ह्या चौकशीमध्ये मुख्य समावेश आहे असे आयकर विभागाकडुन सांगण्यात आले आहे.ह्याच कारणामुळे भाजपचे नेते किरीट सौमय्या यांनी अजित पवार यांना आपल्या निशाण्यावर धरत अजित पवार आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींविषयी आयकर विभागाने चौकशी केली आहे असा टोला दिला आहे.
Via News.360marathi