अचानक राज्यातील तापमानात किंचित प्रमाणात घट झाल्याने अनेक ठिकाणी वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आपल्याला दिसुन येत आहे.
पण मुंबई येथील हवामान अजुनही दमट गरम असल्याचे देखील दिसुन येते आहे.
म्हणुन येत्या 48 तासांमध्ये कधीही आणि केव्हाही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान खात्याकडुन वर्तवण्यात आली आहे.
याबाबत हवामान खात्याने दिलेली सविस्तर माहीती अशी आहे की सध्याच्या परिस्थितीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले दिसुन येत आहे.आणि हेच येत्या काही तासांमध्ये अधिक तीव्र देखील होऊ शकते.याचेच परिणाम स्वरूप ओडिसाच्या किनारपटटीवर जोरात पाऊस पडु शकतो.
आणि ह्याच कारणाने महाराष्टात देखील वीजेचा कडकडाट तसेच मुसळधार पाऊस पडु शकतो.उद्या देखील जोरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असुन त्यानंतर पावसाच्या प्रमाणात थोडी कमी देखील बघायला दिसुन येईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आजच महाराष्टातील अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.म्हणजेच येत्या काही तासांत महाराष्टातील मराठवाडा,उत्तर महाराष्ट,विदर्भ अशा अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.
महाराष्टात असलेल्या एकुण अठरा जागी हा अलर्ट जारी करण्यात आला असुन त्यात नाशिक,धुळे,औरंगाबाद,जळगाव,यवतमाळ,अमरावती इत्यादी अशा अठरा ते वीस ठिकाणांचा समावेश आहे.
पुढील काही तासांत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.आणि ह्या पावसात 30 ते 40 प्रमि तास वेगाने वारे देखील वाहु शकतात.असे देखील हवामान खात्याने वर्तवले आहे.