पेट्रोल डिझेलचे नवीन दर

पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये सुरू असलेली वाढ अजुनही सुरूच आहे.एक आँक्टोंबरपासुनच सुरू झालेली पेट्रोलच्या भाव वाढीची ही मालिका अजुनही थांबलेली दिसुन येत नाहीये.संपुर्ण देशभरात शनिवारी पेट्रोलच्या दरामध्ये अजुन वाढ करण्यात आली आहे.हा तेल कंपन्यांनी सर्वसामान्य माणसाला दिलेला एक खुप मोठा धक्काच आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी याबाबद जे दर जाहीर केले आहेत त्यात पेट्रोल तसेच डिझेलच्या दरामध्ये 35 पैशांनी वाढ झाली आहे असे सांगण्यात आले आहे.तसेच गेल्या आठवडाभरापासुन पेट्रोल डिझेलच्या दरात निरंतर वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशीच पेट्रोल डिझेलमध्ये सातत्याने वाढ होत राहिली तर सर्वसामान्य माणसाला वाहन चालविणेच बंद करण्याची वेळ येते की काय?आणि पदयात्राच करणे सुरू करावे लागणार की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे उभा राहिला आहे.कारण पेट्रोलच्या दरात गेल्या दहा ते पंधरा दिवसात 2.80 रूपयांनी वाढ झाली आहे.तर डिझेल दरातही 3.30 रुपये इतकी वाढ झालेली आपणास दिसुन येते.

चला तर मग जाणुन घेऊ महानगरांमध्ये लागु करण्यात आलेले पेट्रोल डिझेलचे नवीन दर :

दिल्ली : एक लीटर पेट्रोल 105.47 रुपये झाले आहे.
डिझेल 105.47 रुपये प्रतिलीटर करण्यात आले आहे.


मुंबई : एक लीटर पेट्रोलची किंमत 111.44 रूपये अशी करण्यात आली आहे.आणि डिझेलची किंमत देखील 111.44 रुपये प्रतिलीटर इतकी करण्यात आली आहे.


चेन्नई : पेट्रोल 102.60 रुपये इतके वाढले आहे.आणि डिझेलचे भाव198.60 इतके झाले आहेत.


कोलकत्ता: कोलकत्ता मध्ये पेट्रोल 106.12 रूपये आणि डिझेल 97.33 रुपये झाले आहे.


Via News.360marathi


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत